सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी व SDPO :
सर्व कर्मचारी व दुय्यम अधिकारी यांच्या निदर्शनास आणावे की आज पासून आपले पोलीस Covid केंद्र हे शिवाजी विद्यापीठ येथे सुरू केले आहे. या केंद्रात सर्व पोलिस कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी 100 बेड व 20 ऑक्सिजन Bed ची सुविधा उपलब्ध केलेली आहे. ही सर्व सुविधा व तेथील औषधी ही विनामूल्य आहेत. ग्रामीण भागातील कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. मागील दहा पंधरा दिवसात Remdesivir साठी आधी व कर्मचारी यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या सुविधेचा वापर करावा व कुठलीही अडचण असल्यास माझ्या शी संपर्क करावा तसेच पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांची प्रभारी अधिकारी यांनी दररोज बोलावे व त्यांना काही अडचण किंवा गरज असल्यास तात्काळ माझ्याशी 9273041847 var संपर्क करावा.
सर्वांनी Corona संक्रमण टाळण्यासाठी मास्क व Sanitiser यांचा वापर करावा तसेच कुठलीही लक्षणे आढळल्यास अंगावर काढू नये व तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा.
वरील आदेश सर्व प्रभारी अधिकारी हे आपापल्या पोलीस स्टेशन तसेच ब्रांच मधील अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट करतील. सर्वांसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात PI वेल्फेअर व DSB यांच्या अंतर्गत सेल सुरू करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment