संपादक/ सिद्धार्थ शेंडगे यांच्या प्रयत्नांना यश- याबाबत वृत्त असे की
*मोडनिंब मध्ये दलित वस्ती निधीतून १२ हायमास्ट दिवे १६ लाख रुपयांचे बसवले.हे दिवे बसवण्यासाठी सिद्धार्थ शेंडगे यांनी उपोषणाचा अर्ज दिल्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने प्रस्ताव तयार केले.नंतर सिद्धार्थ शेंडगे तीन दिवस आमरण उपोषणास मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसले.या नंतर एक दिवस आमरण उपोषणास पंचायत समिती समोर बसले.तरी सुद्धा ग्रामपंचायत दिवे बसवत नसल्याने शेंडगे यांनी अत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी माढा कोर्टात मा.Bdo साहेब यांनी २० दिवसात कारवाई केली जाईल असे लेखी पत्र दिले यामुळे हायमास्ट दिवे बसवण्यात आले असे वंचित बहुजन आघाडी चे माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ शेंडगे यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी मोडनिंब व परिसरातील सर्व नागरिकांनी माझ्या आंदोलनाला सहकार्य केल्याने दिवे बसवले गेले याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत, ७ महिन्यापूर्वी अशाच पध्दतीने आपण सहकार्य केल्यामुळे ११ हायमास्ट दिवे मोडनिंब मध्ये बसवण्यात आले होते अशी माहिती *सिध्दार्थ (आप्पा ) शेंडगे मा.उपाध्यक्ष वंचित बहुजन अघाडी माढा तालुका* यांनी सांगितली आहे.


No comments:
Post a Comment