*अकलूज आणि परिसरातील सर्व व्यापारी व दुकानदार यांच्या वतीने दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी मा.प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले,
*राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधा आडून सरसकट सर्व व्यवसाय बंद करण्या विरोधात एकजूट दाखवली हे निवेदन मा.प्रांताधिकारी यांनी स्वीकारत असताना सर्व व्यापारी व दुकानदार यांच्या शिष्टमंडळास सर्वांचे कोरोना तपासणी करून घेऊन त्यांचे रिपोर्ट सादर करावेत त्यानंतर मा.जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून व्यवसाय सुरळीत करण्यासंबंधी प्रयत्न करण्यात येतील हा शब्द दिला.*
*आपण सर्वांनी गेल्या दोन दिवसात अकलूज ग्रामपंचायत वतीने कोरोना तपासणी शिबीरा माध्यमातून एकूण १५५७ तपासणी करण्यात आल्या. यामध्ये २९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.*
*अकलूज मधील सर्व व्यापारी व दुकानदार यांनी त्यांच्या कामगार वर्गासह अकलूज ग्रामपंचायत यांच्या आवाहनास प्रतिसाद देत केलेल्या तपासणी नंतर पॉझिटिव्ह रुग्ण मिळालेलं प्रमाण मात्र १.८६% असून जे गेल्या लॉकडाऊन वेळी १०% होते हेही लक्षात घेऊन सोमवार दिनांक १२ एप्रिल २०२१ पासून जे व्यापारी व दुकानदार निगेटिव्ह आहेत यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी मिळायलाच हवी.*
*आज या सकारात्मक निर्णयामुळे अर्थचक्र सुरळीत होऊन उपासमारीची आलेली* *परिस्थिती सुधारून कामगार वर्ग तसेच सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.भविष्यात कोरोना संसर्ग नियमांचे पालन व सॅनिटायझर, मास्क ,सोशल डिस्टसिंग सक्तीचे ठेवत नियमानुसार शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच राहणार व प्रशासनास सहकार्य करणार अशी भूमिका व्यापारी वर्गातुन व्यक्त होत आहे.*
*यासाठी सरसकट व्यवसाय बंद न ठेवता सोमवार दिनांक १२ एप्रिल पासून सर्व व्यवसाय व्यापारी व दुकानदार यांच्या जोखमदारीवर मा.प्रांताधिकारी यांनी व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी व सर्वसामान्यांची होत असलेली उपासमार टाळावी.*
*या काळात परिस्थिती वर नियंत्रण ठेवण्यासाठी अकलूज मधून प्रशासनास सहकार्य करण्यासाठी "सोशल पोलिसिंग पथक" ही निर्माण करण्यात येईल.* अशी माहिती
*शिवतेजसिंह मोहिते-पाटील.*उपसरपंच, ग्रामपंचायत अकलूज.* यांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment