Breaking

Saturday, 3 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- एन.आय.ए.ची दोन दिवस एका महिलेकडे चौकशी.


एन.आय.ए.ची दोन दिवस एका महिलेकडे चौकशी........
 
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येचा तपास करणारे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक गेल्या दोन दिवसांपासून एका महिलेकडे चौकशी करीत आहे.
 महिलेची ओळख, तिचा गुन्ह्यातील सहभाग आणि तिने चौकशीत उघड केलेली माहिती याबाबत एन.आय.ए.कडून गुप्तता पाळली जात आहे.
 या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यासाठी दक्षिण मुंबईतील काही पंचतारांकित हॉटेलमध्ये कायमस्वरूपी खोली आरक्षित करण्यात आली होती, 
अशी माहिती एन.आय.ए.ला मिळाली होती. 
त्यापैकी एका हॉटेलमध्ये केलेल्या चौकशीत या माहितीस दुजोरा मिळाला. 
हॉटेलच्या प्रवेशद्वारावरील, आवारातील सी.सी.टी.व्ही. चित्रणात वाझे ये-जा करताना दिसत आहेत. 
यापैकी एका चित्रणात एक महिला वाझेंसोबत आढळली. 
एन.आय.ए.कडून चौकशी सुरू असलेली महिला हिच असावी, असा अंदाज आहे.
 महिलेला ताब्यात घेण्यात आलेले नाही, 
असा दावा रात्री एन.आय.ए.चे महानिरीक्षक अनील शुक्ला यांनी केला होता. 
दरम्यान, एन.आय.ए.ने मिरा रोड येथील कनकिया भागातील एका घरात शोधाशोध केली. 
मालकाने ही खोली भाड्याने दिली होती. 
मात्र भाडेकरू गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली. 
त्यासोबत एन.आय.ए.च्या अन्य एका पथकाने गिरगाव चौपाटी जवळील एका सोशल क्लबवर छापा घातला. 
 क्लब चालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले. 
क्लबचालक संध्याकाळी पाचच्या सुमारास एन.आय.ए. कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. 
गुन्ह्यात वापर झालेल्या सीम कार्डचे धागेदोरे या क्लबमध्ये सापडल्याचा दावा एन.आय.एकतर्फे करण्यात आला.

No comments:

Post a Comment