Breaking

Sunday, 18 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - प्रिझम डायग्नोस्टीक्स विरोधात छावाची तक्रार.


*प्रिझम डायग्नोस्टिक्स विरोधात छावाची तक्रार* 
*सोलापूर -: प्रिझम मेडिकल डायग्नोस्टिक्स, येथे कोविड स्क्रीनिंगसाठी फुफ्फुसाची तपासणी केलेल्या एका पेशंटला दोन वेगवेगळे रिपोर्ट देणार्‍या प्रिझम डायग्नोस्टिक्सवर गुन्हा दाखल करावा, यासाठी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी ऑनलाइनव्दारे सदर बझार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.*
*याबाबत सविस्तर वृत्त असे की., एका कोविड पॉजिटिव पेशंटला श्वासोश्वासाचा किंवा दम्याचा कोणताही, कसलाही त्रास नसताना त्यांच्या फुफ्फुसांत 68% इन्फेक्शन असल्याचे खोटे दाखवून पेशंटची कंडिशन क्रिटीकल आहे, आणि त्याला व्हेंटिलेटरवर लावावे लागेल, नाहीतर त्याच्या जीवाला धोका होईल, अशी भीती दाखविली. तेव्हा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पेशंटच्या एका नातेवाईकांनी सदरील रिपोर्टबाबत शंका व्यक्त केली. त्यानंतर जवळपास 2-3 तासांनी पेशंटच्या नातेवाइकाला बोलावून, प्रिझम डायग्नोस्टिक्सने पेशंटच्या फुफ्फुसांत 0% Lobe असल्याचे दाखवून पेशंटचे फुफ्फुस नॉर्मल असल्याचा दूसरा रिपोर्ट बनवून दिला. आणि पेशंटला दिलेला पहिला रिपोर्ट त्यांच्याकडून जबरदस्तीने काढून घेतला. यावरून प्रिझम डायग्नोस्टिक्स हे आर्थिक फायद्यासाठी संगनमताने खोटे, बनावट रिपोर्ट देवून पेशंटची लूटमार करीत असल्याचे दिसते. तसेच यामागे खूप मोठे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता असून ह्या बनावट रिपोर्ट प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी छावाचे योगेश पवार यांनी केली आहे.*

No comments:

Post a Comment