Breaking

Wednesday, 28 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - उजनीच्या पाण्याला सांडपाणी नाव देऊन कांगावा करत कुंपनाचे शेत खाणार्या पालकमंत्र्याला जिल्ह्यात येण्याचा नैतिक अधिकार नाही...रयतक्रांती चे प्रा.सुहास पाटील.


*ऊजनीतील पाण्याचा सांडपाणी नाव देऊन कांगावा करत  कुंपणानेच शेत खाणार्‍या पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्याचा नैतिक अधिकार नाही.*  रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील.           टेंभुर्णी (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातून सांड पाण्यापैकी पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळविण्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यशस्वी झाले. म्हणजेच कुंपणाने शेत खाल्ले अशी अवस्था सोलापूर जिल्ह्याची झालेली आहे.याला महाविकास आघाडी सरकारमधील लोकप्रतिधींनी मुकसंमती देऊन पालकमंत्र्यांना पाणी मंजुरी मिळवुन देण्यास हातभारच लावला आहे. उजनीच्या बॅक वॉटर मध्ये पुणे जिल्ह्यातून येणारे सांडपाणी हे नाव देऊन पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला मिळण्याची मंजुरी नुकतीच महा विकास आघाडी सरकारने दिली आहे.या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे उन्हाळी पाणी आवर्तन शेतीला मिळणार नाही. मे महिन्यातील पाणी आवर्तन शेती पिकासाठी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तरी आघाडी सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतकर्‍यांना बरोबर घेत "हक्काचं पाणी बचाव आंदोलन" उभे करणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक अपूर्ण उपसा सिंचन योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्पावर बार्शी उपसा सिंचन योजना २.५९,सिना माढा ऊपसा सिंचन योजना ४.५०, दहिगाव उपसा सिंचन योजना १.८१,भीमा सिना जोड कालवा योजना ३.१५, सांगोला उपसा सिंचन योजना २, एकरूप उपसा सिंचन योजना ३.१६,आष्टी उपसा सिंचन योजना १ टिएमसी या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. शिवाय मंगळवेढ्यातील ३५ गावांसाठी ६ टीएमसी पाण्याची योजना या वर्षात मंजूर करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात केली आहे. दक्षिण सोलापूर मधील २२ गावांच्या पिण्याचे पाणी योजना निधीअभावी प्रतीक्षेत असताना शासनाने हा घेतलेला निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. या निर्णयाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मूकसंमती दिलीच कशी हा संतप्त सवाल सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभा राहिला आहे. यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेत "उजनी धरण हक्काचं पाणी बचाव आंदोलन" हे जनांदोलन उभा करीत आहोत. आम्ही संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या या बेजबाबदार वर्तनाचा निषेध करीत आहोत. महा विकास आघाडी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व विरोधीपक्षीय जन आंदोलनास रयत क्रांती संघटना पाठींबा देत आहे. सोलापूर जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेच्या वतीने "माझे घर हेच रणांगण" याद्वारे उजनी धरण बचाव आंदोलन करीत आहोत या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जलसंपदा विभाग व मुख्यमंत्री कार्यालयास पाठवलेल्या आहेत अशी माहिती रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment