सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- राष्ट्रीय महामार्गावर पत्रकारांना टोलमाफी व विमा कवच- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितींजी गडकरी यांनी केली आहे सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले त्यामुळे आता राज्यातील पत्रकारांना टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे आमदार खासदार मंत्री स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रमाणे पत्रकार देखील समाजासाठी झटत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रस्ता आहे हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिँधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे तर राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करत असल्याची घोषणा नितीनजी गडकरी यांनी केली व तसे अधिष काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या त्याचप्रमाणे आपल्या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही यावेळी नितीनजी गडकरी यांनी केले तसेच ही घोषणा फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे तर राज्यातील सर्वच सरसकट पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
Friday, 2 April 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment