Breaking

Monday, 8 March 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- अधिकारी, जनता आणी माज.


*अधिकारी, जनता आणि माज*
*************************
*सविंधानाची ताकत*
********************
*2 मार्च 2021 रोजी बशीर जहागिरदार यांनी दाखल केलेले एका केस मध्ये मा.माढा कोर्टाने तत्कालीन जिल्हा परिषदेचे CEO,तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे Collector श्री अरुण किशोर डोंगरे यांचेवर 420 फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही प्रशासकिय अधिकार्यांसाठी अत्यंत निंदनीय बाब आहे.टेंभुर्णी येथील एका सामाजिक विषयी बशीर जहागिरदार यांनी 2016 साली गैरकारभार,भ्रष्टाचार झाले प्रकरणी या बाबतची तक्रार  तत्कालीन CEO अरुण डोंगरे यांचेकडे केली होती.परंतू त्यांनी त्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही.कागदोपत्री पुरावे दिले,सर्व प्रकरणाची माहीती दिली तरी देखील त्यांनी बशीर जहागिरदार यांना न्याय दिला नाही. "या उलट त्यांनी भ्रष्टाचार करणारे यांचे सोबत संगनमत करुन त्यांना वाचवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करणेसाठी मदत केली."*

*वरिष्ठ अधिकारी यांचेकडे न्याय मागितला त्यांनी देखील न्याय दिला नाही.दिड वर्ष बशीर जहागिरदार हे मंत्रालय,विभागीय आयुक्त पुणे,प्रधान सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी यांचेकडे दाद मागत होते तेथेही हाती काहीच लागले नाही. फसवणुकीचा प्रकार असल्याने टेंभुर्णी पोलिसांकडे ते गेले,तिथे ही निराशा हाती लागली.*

*शेवटी माढा कोर्टात बशीर जहागिरदार यांनी धाव घेतली.सर्व पुरावेसहित प्रायवेट केस दाखल केली.कोर्टाने या विषयी पोलिसांना कलम 202 प्रमाणे चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले.त्या प्रमाणे पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केले आणि या आधारे मा.कोर्टाने CEO डोंगरे सहित इतर 6 आरोपींवर 420 व इतर कलमांखाली 2 मार्च 2021रोजी गुन्हा दाखल केला.*

*न्याय मिळण्यास बशीर जहागिरदार यांना 3 वर्षे लागली. काही हरकत नाही. परंतू एका मस्तिखोर अधिकार्याची मस्ती आणि माज जिरवल्याचा आनंद झाला असल्याचे बशीर जहागिरदार यांनी VBP NEWS सोबत बोलताना सांगितले, बशीर जहागिरदार यांचे असे म्हणणे आहे की  अनेक लोक कोणत्या ना कोणत्या विषयी सरकारी कार्यलयात तक्रार करतात,परंतू हे अधिकारी त्या लोकांना न्याय देत नाही.कार्यालयाचे चक्कर काढून काढून सामन्य माणुस हताश होतात.अनेक प्रकरणात राजकीय दबाव असल्याने सामन्यांना न्याय मिळत नाही,म्हणून काही लोक प्रश्न सोडून देतात तर काही लोक हार मानतात.आपल्या हार मानण्याने व निराश होऊन प्रकरण अर्ध्यावर सोडल्याने हे अधिकारी निर्ढावले आहे.त्यांना सामन्यांची कमजोरी माहीत झाल्याने यांना मस्ती आली आहे.परंतू मित्र हो नाराज न होता,हार न मानता,आपले धेय साधल्या शिवाय गप्प बसायचे नाही.प्रत्येक प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत राहा उशीरा का होइना यश हमकास मिळ्ते.*
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे या भारत देशात तुम्ही एक कागद आणि पेन घ्या तुम्हाला लोकशाही मार्गाने न्याय जरुर  मिळेल* असे मत बशीर जहागिरदार यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment