सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याचा खून- याबाबत वृत्त असे की सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावात उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणी भाजप खासदार संजय पाटील यांच्या बोरगावातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव या ठिकाणी उपसरपंच निवडीच्या वादातून ग्रामपंचायत सदस्यचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, उपसरपंच निवडीच्या वादातून झालेल्या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे, पांडुरंग काळे असे मृत सदस्याचे नाव आहे, तर या हाणामारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 4-5 जण जखमी झाले आहेत, भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे, पांडुरंग काळे यांच्या सह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणी राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, आणी ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment