Breaking

Wednesday, 24 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- हे महाराष्ट्रात फुदकणार्या भाजपवाल्यांना सांगता येईल काय? शिवसेनेचा पलटवार.


…हे महाराष्ट्रात फुदकणाऱ्या भा.ज.पा.वाल्यांना सांगता येईल काय?; 
शिवसेनेचा पलटवार......
 
.“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करावे अशा पद्धतीचा गोंधळ या लोकांनी घातला. 
प्रश्न असा आहे की, हे सर्व लोक मूर्खांच्या नंदनवनात जणू ‘बेवडा’ मारून फिरत आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भा.ज.पा.वर हल्लाबोल केला आहे. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणापाठोपाठ पोलीस बदल्यांवरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. 
बदल्यांच्या रॅकेटवरून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. 
भा.ज.पा.कडून झालेल्या आरोपांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. 
देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगचा ६.३ जीबी डेटाचा पेनड्राईव्ह दाखवत ठाकरे सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 
फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून केलेल्या आरोपांचा शिवसेनेनं सामना अग्रलेखातून समाचार घेतला आहे. 
“राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अद्यापि शासनाच्या सेवेत आहेत याचे आश्चर्य वाटायला हवे. 
परमबीर सिंग यांनी फक्त गृहमंत्र्यांवर आरोपच केले नाहीत, तर आपण केलेल्या आरोपांची सी.बी.आय.मार्फत चौकशी व्हावी यासाठी हे महाशय मे.सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. 
इतके होऊनही त्यांच्यावर सेवाशर्ती भंगाचा बडगा ठेवून कारवाई केली गेलेली नाही. 
दुसरे एक अधिकारी संजय पांडे यांनीही मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून ‘बढती’प्रकरणी आपल्यावर कसा अन्याय झाला हे स्पष्ट केले. 
पांडे यांनी त्यांच्या पत्रात इतरही बरेच मुद्दे उपस्थित केले आहेत. 
राजकीय दबाव, बरी-वाईट कामे करून घेण्याविषयी सरकारचे दाबदबाव याविषयी स्फोट केले आहेत.

No comments:

Post a Comment