टेंभुर्णी (प्रतिनिधी)
भारतीय जनता युवा मोर्चा टेंभुर्णी शहर च्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा तहसील कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालया अव्वल कारकून हे पद रिक्त असून यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीला सामोरे जावे लागत आहे त्यामुळेच रिक्त असलेल्या अव्वल कारकून यांची नियुक्ती बाबत व योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले जमा करण्याची मुदत मार्च पर्यंतच असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची दाखले अद्यापही मिळाले नसल्यामुळे लाभार्थ्यांना दाखले जमा करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असे निवेदन भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे टेंभुर्णी शहराध्यक्ष विजय कोकाटे यांनी दिले.
यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे ,ग्रा प सदस्य प्रतिनिधी जयवंत पोळ,भाजपा तालुका उपाध्यक्ष मगनदास महाडिक,विष्णू बिचकुले,भाजयुमोचे तालुका सरचिटणीस गिरीश ताबे,ग्रा प सदस्य विकास धोत्रे ग्रा प सदस्य हरिभाऊ सटाले, राजू पाटील अविनाश धोत्रे,वैभव वाघावकर,सोमनाथ टोणपे,महेश आवसलकर कैलास आतकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


No comments:
Post a Comment