Breaking

Wednesday, 17 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अंबानीच्या घराबाहेर आरामात सॅन्डविच खाणार्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- अंबानीच्या घराबाहेर आरामात सॅन्डविच खाणार्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला- याबाबत वृत्त असे की उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके सापडल्यानंतर प्रोटोकॉलचे पालन न केल्याच्या कारणावरून सचिन वाझे आणी राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या ATS एका अधिकार्यामध्ये खटका उडाल्याची माहिती समोर आली आहे, या वादाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनाही देण्यात आली होती,  सूत्रांच्या माहितीनुसार 25 फेब्रुवारीला अंबानीच्या घरासमोर स्फोटके मिळाल्याचे समजल्यानंतर एटीएसचे पथक त्याठिकाणी पोहचले, तेव्हा एटीएसच्या अधिकार्याने स्फोटके ठेवलेली स्काॅर्पिओ कुठे आहे, असा प्रश्न सचिन वाझे यांना विचारला त्यावेळी सचिन वाझे सॅन्डविच खात उभे होते, त्यांनी एका पोलिस कर्मचार्याला साहेबांना गाडी दाखव असे फर्मान सोडले, सचिन वाझे यांच्या या वर्तणुकीमुळे संबंधित एटीएस अधिकारी प्रचंड संतापला होता, सचिन वाझे यांनी पोलिसांच्या प्रोटोकॉल चे पालन केले नाही,अशी तक्रार ही त्याने वरिष्ठांना केल्याचे समजते. पोलिस तपासाच्या नावाखाली सचिन वाझे यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे, सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन प्रकरणात अनेक मुद्देमाल जप्त केला आहे, मात्र या गोष्टी त्यांनी पोलिस रेकाॅर्डवर ठेवल्याच नाहीत,अशी माहीती आता पुढे आली आहे, मनसुख हिरेन प्रकरणात अनेक धागेधोरे समोर येत असून आता नवीन माहिती समोर आली आहे, ती म्हणजे स्काॅर्पिओ गाडी अंबानीच्या घराशेजारी मिळाली ती स्काॅर्पिओ मनसुख हिरेन यांची होती, या स्काॅर्पिओ गाडीत ज्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरू कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment