Breaking

Friday, 26 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्यांचा कर्दनकाळ...प्रा. सुहास पाटील सर.


*(भाग-२)महाआघाडी सरकार हे शेतकऱ्यांचा कर्दनकाळ* - आज बरोबर एक वर्ष झालं, संपूर्ण जगावर कोरना विषाणूने साम्राज्य निर्माण केलं आणि या महामारीने जगातील असंख्य लोकांचा बळी घेतला.त्यात महाराष्ट्र ही मागे राहिला नाही.भारतात सगळ्यात जास्त कोरोना संक्रमण महाराष्ट्रात झाले.सध्या  महाराष्ट्रातील शेतकरी कोरोनाच्या भयाने,भीतीने कर्जबाजारी बनला. *गेल्या वर्षभरात शेतकर्‍यांच्या पिकवलेल्या मालाला दरच मिळाला नाही*. आणि गेल्या दोन महिन्यांपासुन कोरोना कमी होतोय,असे वाटत असतानाच,पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढायला लागले. शेतकरी भयग्रस्त झाला. आपण कष्टाने पिकवलेल्या मालाला दर चांगला मिळेल का ? याची चिंता त्याला सतावु लागली आहे.शेतकऱ्यांनी स्वतःची पुंजी शेतीमध्ये लावली. आणि शेती माल,फळे व भाजीपाला तयार करू लागला.आणि अशातच सरकारने लाॅक डाऊन करायला पुन्हा सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम असा झाला,शेतकर्‍याचा तयार झालेला माल, व्यापारी कवडी मोल किंमतीने खरेदी करू लागला आहे. व्यापार्‍यांनी कोरनाच्या नावाखाली पुन्हा एकदा शेतकर्‍याला भीती घालून कमीत कमी किमतीमध्ये त्याचा मालक विकत घेण्यास सुरुवात केली आहे.म्हणजे महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्याला कोरोना विषाणू पेक्षा *कृत्रिम कोरोनो व्यापारी विषाणू* हा भयानक वाटू लागलेला आहे. एकंदरीत शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्याला भीती वाटत वाटत आहे की, आपल्या मालाला भाव मिळेल की नाही. सर्व स्वप्न स्वतःच्या शेती मालावर रंगवत असताना,जर *कृत्रिम कोरोनो व्यापारी विषाणूने* जर शेतकऱ्यांमध्ये संसर्ग निर्माण केला, तर संपूर्ण महाराष्ट्राची शेती उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.आणि याकडे सरकारने आवर्जून लक्ष दिले पाहिजे. सरकारने कोरना विषाणू या महामारीकडे ज्या पद्धतीने लक्ष दिले आहे.त्याच पद्धतीने *जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे*.पण सध्या शेतकरी *कृत्रिम कोरोना व्यापारी विषाणूने* पछाडलेला आहे. त्यांच्या भीतीने भयभीत झालेला आहे. मार्केटमध्ये तयार झालेला माल व्यापारी अतिशय कमी भावात विकत घेत आहेत.व पुढील मार्केटमध्ये स्वतः घेतलेला माल चांगल्या दराने विकत आहेत. म्हणजेच *कृत्रिम कोरोना व्यापारी विषाणू* हा मालामाल,अति श्रीमंत होत चाललेला आहे. व महाराष्ट्रातील शेतकरी गरीबीच्या दिशेने वाटचाल करत आहे. याकडे या महाआघाडी सरकारने लक्ष दिले पाहिजे.नाहीतर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा कर्जबाजारी व आत्महत्येला कवटाळून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या महाआघाडी  सरकारला एक विनम्र आवाहन आहे की,रोज सोशल मीडियातून, टीव्हीवरून थोड्याच दिवसात लाॅक डाऊन जाहीर होणार ही भीती दाखवली जात आहे.कोरोनाचे सर्व नियम आपण आत्मसाथ करूयात.पण लाॅक डाऊन हौणार या भीतीपोटी *कृत्रीम विषाणू व्यापारी* शेतकऱ्याचा माल खूप कमी दरात घेऊन,स्वतःचा फायदा मिळवीत आहे.साठेबाजी करीत आहेत.याकडे सरकारचे कसलेच लक्ष नाही.म्हणून महाआघाडी सरकारने सर्व व्यापारी केंद्रांवर धाडी टाकून त्यांच्या तपासण्या कराव्यात.यातून शेतकऱ्याला भयमुक्त करावे.सध्या शेतकर्‍यांच्या विज बिल वसुलीसाठी विज पुरवठा बंद केला आहे. शेतकर्‍यांचा हाता  तोडांशी आलेला घास हे महाआघाडी सरकार हिसकावुन घेत आहे.विज बंद न करता,वसुली सुरू ठेवावी.गेल्या ६ दिवसांपासुन शेतकर्‍यांंचा विज पुरवठा बंद करून वसुली सुरू आहे.या सहा दिवसातील विज बंदमुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे,याला महाआघाडी सरकारच जबाबदार आहे. म्हणून शेवटी म्हणावेसे वाटते की, *महाआघाडी सरकार हे शेतकर्‍यांचा कर्दनकाळ* ठरत आहे. * *प्रा सुहास पाटील. जिल्हा संपर्कप्रमुख- रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा तथा मा सदस्य- राज्य कृषि मूल्य आयोग महाराष्ट्र शासन*.

No comments:

Post a Comment