Breaking

Friday, 26 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- लाॅकडाऊन लावल्यास मजुरांना 5000 रूपये हप्ता मिळावा....शेख सादेक भैय्या.


लॉक डाऊन लावल्यास मजरांना ५००० रु.हफ्ता मिळावा
 -शेख सादेकभैया ---------------------------------------------------
माजलगाव दि २५
महाराष्ट्र शासनाने बीड जिल्हा लॉक डाउन केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार व इतर मजुर ज्यांचे हातावर पोट आहे.अशा मजुरांच्या हातावर पोट भरतात परंतु जर लॉक डाऊन लावले तर अशा कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. आशा परिस्थितीत ह्या मजुरांना उपाशी राहावे लागेल.कारण रोज कमवून हे आपल्या कुटुंबाचे पोट भरतात रोजच्या कामावर ह्यांचा घरप्रपंचाचा गाडा चालतो परंतु जर काम नसेल तर यांनी खायचे काय आणि आपले पोट कसे भरायचे.
यामुळे जर लॉकडाऊन लावायचे आसेल तर आधि या मजुरांच्या पोटापाण्याची सुविधा म्हणुन ५००० रु.(पाच हजार रुपये) अनुदान द्यावा जेणेकरुन मजुरांना त्याचे कुटुंब जगविण्यासाठी हातभार लागेल. अन्यथा लॉकडऊन रद्द करावे व कडक नियम लागु करावे.अशी विनंत येथील यांनी काल येथील तहसील व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना संघर्ष मजूर क्रांती  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख सादेक भैया यांनी केली आहे

No comments:

Post a Comment