Breaking

Tuesday, 16 February 2021

माढा तालुका प्रतिनिधी / मदन मुंगळे- आर.आर.आबा सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत VSTF अभियानातील भेंड या गावास जिल्हास्तरीय समीतीची भेट.


*आर आर आबा सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत VSTF अभियानातील भेंड या गावास जिल्हास्तरीय समितीची भेट*

आर आर (आबा )सुंदर गाव पुरस्कार योजना सन 2020-21 अंतर्गत जिल्हास्तरीय निवड समितीची भेट मौजे भेंड (तालुका-माढा, जिल्हा -सोलापूर ) येथे आज मंगळवार  दिनांक, 16/02/2020 रोजी झाले. 
         यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे *मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिलीप स्वामी साहेब(भा.प्र.से)* यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडून गाव पाहणी करण्यात आले. 
निवड समितीमध्ये *मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील मॅडम,* *मा. बेदगुंडे साहेब* (कृषी अधिकारी, जि.प. सोलापूर), *मा. कटक धोंड साहेब* (कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा), *मा. सुर्वे साहेब*(मुख्य लेखा व वित्त अधिकारी), *मा.डॉ संताजी पाटील साहेब*(गट विकास अधिकारी), *मा. गफार शेख* (उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा), *रेपाळ साहेब* (विस्तार अधिकारी) आदी मान्यवर अधिकारींनी आपल्या खात्या अंतर्गत विविध विभागाचे तपासणी करण्यात आले. यावेळी सॅनिटेशन, मॅनेजमेन्ट, अकाऊंटॅबिलिटी,पर्यावरण, VSTF अंतर्गत पूर्ण झालेले कामे, शाळा, अंगणवाडी, शौचालय, गाव अंतर्गत रस्ते, लेखा तपासणी, ग्रामपंचायत कागदपत्रे, पाणी नमुना अहवाल, शाळा खोली बांधकाम, शालेय गुणवत्ता तपासणी, अद्यावत सुरु असलेले कामे, सौर ऊर्जा, आरोग्य उपकेंद्र तपासणी  ई. विविध कामाचे पाहणी करण्यात आले.यावेळी गावात विविध माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले कामे व्हिडिओस/फोटोस द्वारे प्रेसेंटेशन ग्रामपंचायत कार्यालयात दाखवण्यात आले. गावातील मागील काळात पूर्ण झालेल्या कामाचा धावता आढावा घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांचा सहभाग हा उल्लेखनीय असा होता. प्रास्ताविक तसेच गावाबद्दल थोडक्यात माहिती श्री.संतोष दळवी यांनी केले. VSTF कामाबद्दल तसेच गेल्या 2 वर्षांपासून पूर्ण करण्यात आलेल्या कामाबद्दल माहिती श्री.आनंद पुजारी यांनी दिले. 
 VSTF मार्फत सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्या कार्यकारी 
श्री. नंदकिशोर शेळके सर* यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान बाबत माहिती आनंद पुजारी यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. यावेळी  ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, महिला बचतगट अध्यक्ष/सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी पाटील साहेब, शेळके मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment