Breaking

Sunday, 21 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- रात्री संचारबंदी, लाॅकडाऊनचा निर्णय हा पूर्ण नागरिकांच्या हातात.


  रात्री संचारबंदी; 
लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात :
 भुजबळ....
 
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. 
मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. 
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. 
दरम्यान, नाशिकमध्ये  रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदीची घोषणा  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली . 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. 
तसेच, लॉकडाउनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. 
कोरोनाचा धोका वाढतोय त्यामुळं नियमांचं पालन करा, मास्क न वापरल्यास १ हजार रुपये दंड भरावा लागणार, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर आहे त्यापेक्षाही कडक निर्णय घ्यावे लागतील.
 असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. 
 लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. 
जर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. 
मास्क आणि सॅनिटायजरचा वापर नियमित केला तरच हे शक्य आहे. 
अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागेल.
 राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे.
 लॉकडाऊन करणे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारे नाही. 
मात्र रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment