Breaking

Sunday, 21 February 2021

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी/ सागर लोखंडे- स्वागत करणं भोवल, गुंड मारणेच्या ताफ्यातील 17 जणांना बेड्या, 200 जणांचा शोध सुरू.


स्वागत करणं भोवलं; 
गुंड मारणेच्या ताफ्यातील १७ जणांना बेड्या; 
२०० जणांचा शोध सुरू........
 
गुंड गजानन मारणे याच स्वागत करणं साथीदारांना चांगलंच महागात पडलं आहे. 
तळोजा कारागृहातून मारनेची सुटका होताच त्याचा समर्थनात आणि स्वागत करण्यासाठी पुणे आणि परिसरातील तब्बल २०० वाहने हजर होती.
 द्रुतगतिमार्गावरील उर्से टोल नाका येथील फूड मॉल येथे फटाके वाजवून आणि आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. 
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मारनेच्या ताफ्यातील १७ जणांना बेड्या ठोकल्या असून ११ आलिशान मोटरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
  अद्याप मुख्य आरोपी गजनन मारणे हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी चार पथक रवाना केली असून इतर १५०-२०० जणांचा शोध घेण्यासाठी ९ तपास पथक त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. 
अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे.
 सविस्तर माहिती अशी की, गजनन उर्फ गज्या मारणे हा नुकताच तळोजा कारागृहातून सुटला असून त्यांच्या स्वागतासाठी तब्बल २०० वाहनातून साथीदार आले होते. 
सुटका होताच पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर फिल्मीस्टाईल रांगेत मोटरी चालवत एक प्रकारच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 त्याचे व्हि.डि.ओ. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
 दरम्यान, उर्से टोल नाका येथील फूड मॉल इथे थांबून फटाके वाजवत आरडा ओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 
याचे चित्रीकरण ड्रोन द्वारे करण्यात आले होते.
 याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह ताफ्यातील ३० ते ४० गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी एक ड्रोन, महागड्या ११ मोटारी आणि १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 
अद्याप २०० वाहने आणि आरोपी यांना अटक करणे बाकी असून ९ तपास पथके आरोपींच्या शोध घेण्यास रवाना करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment