पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- दहावी- बारावी बोर्ड परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा- याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी व्हावा यादृष्टीने एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधाही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडील छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल त्या छापील वेळापत्रकावरून तारखांची खात्री करून घ्यावी तसेच पण या यंत्रणेने छपाई केलेले व्हाट्सअप किंवा सोशल मीडियाद्वारे व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य नये असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी केले आहे.
Wednesday, 17 February 2021
Home
/
पुणे
/
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- दहावी-बारावी बोर्ड परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- दहावी-बारावी बोर्ड परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment