सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- कराड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेट्रोल, डिझेल, दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने- याबाबत सविस्तर वृत्त असे की
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका कराड , जिल्हा सातारा मनसेचे योगेश खडके यांचे नेतृत्वाखाली कराड शहर, तसेच उपनगरात वाढत्या पेट्रोल , डिझेल, दरवाढ विरोधात, तसेच केंद्र सरकार देत असलेली गॅस सबसिडी बंद करण्यात आली. ती पुर्ववत चालू करावी या करता मनसेने नागरिकांची स्वाक्षरी घेऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी मनसेचे योगेश खडके चंद्रकांत पवार, स्वरूप निकम, भानुदास डाईगडे, स्वप्नील गोतपागर, अनिकेत कारंडे, दशरथ पवार, गिरीश मोहिरे, संजय तांबे, अमोल साठे, मनोहर सरगर, निखिल जाधव, भारती गावडे,मनीषा चव्हाण, स्नेहल मिसाळ, नितीन शिंदे, स्वप्नील पवार, मनोज पांगे, दत्ता पवार, संभाजी सकट, सतीश कुंभार, अमोल घुमाळ , दादा यादव, गिरीश सुतार, मनसे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या स्वाक्षरी मोहीमेत १५०० हुन अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.*


No comments:
Post a Comment