Breaking

Tuesday, 2 February 2021

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके- सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांना राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स-द रिअल हिरो हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-  सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांचा राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स-द रिअल हिरो पुरस्काराने सन्मानित- याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पदावर रूजू असलेल्या व पूर्वी सातारा जिल्ह्याचे पदभार सांभाळलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी कोरोना च्या काळात सोलापूर व सातारा शहरातील कोविड-19 संसर्गाची परिस्थितीतील प्रभावापासून ग्रामीण जिल्ह्याचा भाग अत्यंत मेहनतीने व सचोटीने प्रयत्नशील राहून सुरक्षित ठेवला आणी या कालावधीत समाजाचे सर्व घटक आणी सातारा व सोलापूर ग्रामीण जिल्ह्या पोलिस दल सुरक्षित ठेवण्यात एक आदर्श घालून दिला. याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाकडून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांना राष्ट्रीय पातळीवरील कोविड वूमन वारियर्स-द रिअल हिरो हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment