Breaking

Tuesday, 2 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- आजच्या तरूणांनी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे...प्रा.सुहास पाटील.


आजच्या तरुणांनी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे. प्रा.सुहास पाटील सर - आजच्या तरुणांनी व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक तथा राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी सदस्य प्रा सुहास पाटील यांनी केले.मोडनिंब येथील एस.के इलेक्ट्रिकल्स अँड ग्राफिक्स या नवीन दुकानच्या उद्घाटन प्रसंगी  बोलत होते.सुमित ओहोळ व केतन ओहोळ या बंधूंनी महाविद्यालयीन शिक्षण घेत वायरमन चा कोर्स केला आणि त्यांनी आज स्वतःचे इलेक्ट्रिकलचे दुकान मोडनिंब येथे सुरू केले.या दुकानचे ऊद्गघाटन प्रा सुहास पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा पाटील म्हणाले, सध्याच्या काळात स्व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची गरज असून त्याच्या आधारेच आजचा युवक स्वतःचा व्यवसाय निवडू शकतो. वायरमन, प्लंबिंग, सुतार काम, फर्निचर, मोबाईल दुरुस्ती इत्यादी कोर्सेस आजच्या युवकांसाठी संधी बनलेली आहे. यावेळी मोडनिंब ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य अमर ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे, किशोर औहोळ, प्रमोद गाडे, मनसेचे नेते राहुल सुर्वे,भाजपचे नेते धनाजी लादे, गोरख परबळकर,सतिश ओहोळ,अमोल मोरे,राहुल जवंजाळ, गोटेश पुरवत, प्रतीक शिंदे,अतुल सुर्वे, सोमनाथ सुर्वे, अण्णा डोंगरे, उल्हास जाधव,सौरभ शिंदे,मोहन शेळके,योगेश भालशंकर आदीजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment