Breaking

Wednesday, 17 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- काॅलनीतील राहिवाशांच्या लढ्याला अखेर यश, अखेर गुडलक हाॅटेल गल्लीत वाहने लावण्यास मनाई.


 कॉलनीतील रहिवाशांच्या लढय़ाला यश,
अखेर गुडलक हॉटेल गल्लीत वाहने लावण्यास मनाई.......

 पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील गुडलक हॉटेलजवळील गल्लीत बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे या भागातील रहिवाशांना गेल्या काही वर्षांपासून मोठा त्रास होत होता.
 या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती.
 गुडलक हॉटेलजवळील गल्लीत सर्वप्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी नुकतेच दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
 डेक्कन जिमखाना कॉलनीत ९० बंगले आहेत. 
प्रभात रस्ता, भांडारकर रस्त्यालगतचा भाग कॉलनीत येतो. 
सुवर्णस्मृती मंगल कार्यालयाच्या परिसरातील रहिवाशांना जाण्यासाठी गोखले स्मारक चौकातून मार्ग उपलब्ध होता. 
खंडुजीबाबा चौकातून गोखले स्मारक चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चॅम्पियन स्पोर्टस्च्या गल्लीतून वळण्यास मनाई असल्याने रहिवाशांना गोखले स्मारक चौकातून वळून कॉलनीत जावे लागत होते. 
अरुंद गल्लीत वाहने लावण्यात आल्याने रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत होते, 
असे डेक्कन जिमखाना कॉलनी पंचायतीचे  सदस्य किशोर गोडबोले यांनी सांगितले.  
या गल्लीत वाहने लावण्यास मनाई करण्यात यावी, अशा तक्रारी रहिवाशांकडून करण्यात आल्या होत्या. 
तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना निवेदन देऊन समस्या मांडण्यात आल्या होत्या.

 आदेश काय ? 

हॉटेल गुडलक लेन (गुडलक हॉटेल ते सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रस्ता) दोन्ही बाजूला सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचे आदेश शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिले आहेत. 
या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात यावी, असे फलक बसविण्याबाबत महापालिकेला पत्र देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment