Breaking

Monday, 1 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाची अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाची अकलूज येथील शासकीय विश्रामगृहावरती बैठक पार पडली- याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुजन सत्यशोधक संघाची अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली. प्रथम महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले आणी नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी पदाधिकारी निवडी पार पडल्या, या बैठकीला बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिलजी ओहोळ हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये शेतकरी विरोधी कायदे, मागासवर्गीय निधी, महाराष्ट्रातील व देशभरातील बहुजनांवरती होणारे अन्याय व अत्याचार याविषयी गांभिर्याने चर्चा झाली. विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप मिळण्यासाठी विलंब होत असेल तर कार्यकर्त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संघटनेचे लिगल अॅडवायझर अॅड धनंजय बाबर, रामभाऊ कांबळे, महादेव लोंढे, सतिश वाघमारे, बबलू कांबळे, बनि धांजे, विशाल ठोंबरे, मोहम्मद शेख, गणेश ठोंबरे, सचिन सरवदे, सिद्धार्थ साळवी, राहूल सरवदे, सुजित गायकवाड, जमीर शेख, आप्पा ओहोळ, गणेश कोळी, अक्षय सरवदे, किरण धोंडे, समाधान लोहार, गोवर्धन खंडागळे, निहाल शेख, दादासाहेब दळवी, अमित ओहोळ, व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment