गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ मिरवणुकीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले….....
गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणाची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे.
सोशल मीडियावर व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजानन मारणेसह नऊ जणांना अटक केली.
मे.पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांनी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूरही करण्यात आला.
मात्र राज्यात अशाप्रकारे गुंडाने मिरवणूक काढून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना गजानान मारणेकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे.
त्याची माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल”.
दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करणारं कोणीही असो मग ती राजकीय क्षेत्रातील असेल, गुंडगिरी करणारी, किंवा टोप्या घालणारी असेल.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे.
सर्वांनी चौकटीत राहूनच आपलं काम केलं पाहिजे”.
काय आहे प्रकरण.....
गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता.
मात्र मे.न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं.
सोमवारी तळोजा कारागृहातून गुंड गजानन मारणे याची सुटका झाली होती.


No comments:
Post a Comment