सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - जिल्ह्यातील पशुवैध्यकिय दवाखन्यात अधिकार्यांच्या नेमणूका त्वरीत करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांची मागणी- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्य हा महाराष्ट्रात दुध व्यवसायासाठी अग्रेसर आहे, येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करतो आहे, आणी जिल्ह्यातील 70ते80% लोकांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून आहे, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुवैध्यकिय दवाखने आहेत परंतु त्या ठिकाणी पशुवैध्यकिय अधिकार्यांची पदेच रिक्त आहेत यामध्ये श्रेणी-1, श्रेणी-2, ची पदे जवळ जवळ जिल्ह्यात 70 पदे अश्या प्रकारे रिक्त आहेत, सध्या रोगाचे प्रमाण जास्त असल्याने व जनावरांना शासकीय डोस वेळेत मिळत नाहीत, आणी पशुवैध्यकिय दवाखान्यातील पदभार हा तेथील कर्मचार्यांवर सोपवल्याचे दिसत आहे, त्यात मोडनिंब ची अवस्था तर फार बिकट आहे मागील 7-8 वर्षापासून अधिकृतपणे मोडनिंबला पशुवैध्यकिय अधिकारीच नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाचे खूप हाल होत आहेत यासाठी जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदावरती त्वरीत अधिकारी नेमणूका झाल्या पाहिजेत अशी मागणी मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिलजी छत्रपाल साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाची दखल न घेतल्यास लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांतजी गिड्डे यांनी दिला आहे.
Wednesday, 10 February 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - जिल्ह्यातील पशुवैध्यकिय दवाखन्यात अधिकार्यांच्या त्वरीत नेमणूका करा....प्रशांतजी गिड्डे यांची मागणी.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - जिल्ह्यातील पशुवैध्यकिय दवाखन्यात अधिकार्यांच्या त्वरीत नेमणूका करा....प्रशांतजी गिड्डे यांची मागणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment