मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टी गावातून कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर तात्काळ बंद करण्याची मोहोळ तालुका वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष महादेव गाडे यांची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे आष्टी ता.मोहोळ, जि.सोलापूर येथील औदुंबररावजी आण्णा पाटील साखर कारखान्याला जाणारे ऊसाचे ट्रॅक्टर जवळ जवळ 16-18 टन ऊसाचा ओव्हरलोड घेऊन आष्टी या गावातून कारखान्याकडे जातात तरी आष्टी या गावात ट्रॅक्टर जाणार्या प्रमुख रस्त्यावर दलित वस्ती रोड, प्रमुख चौक, समाज मंदिर रोड,धार्मिक मंदीरे, या सारख्या ठिकाणी जास्त वर्दळ असते याच ठिकाणाहून ट्रॅक्टर जास्त ओव्हरलोड घेऊन जातात त्यामुळे आष्टी गावातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे ,तसेच त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, तरी कारखान्याकडे ओव्हरलोड ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर तात्काळ बंद करावेत अश्या प्रकारचे लेखी निवेदन मोहोळ तालुका वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष महादेव गाडे यांनी मा.तहसीलदार सो यांना निवेदन दिले आहे.
Tuesday, 2 February 2021
Home
/
मोहोळ
/
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज-आष्टी गावातून कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर तात्काळ बंद करण्याची मोहोळ तालुका वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष महादेव गाडे यांची मागणी.
मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज-आष्टी गावातून कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर तात्काळ बंद करण्याची मोहोळ तालुका वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष महादेव गाडे यांची मागणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment