Breaking

Sunday, 7 February 2021

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी/ आयपीएल च्या लिलावात यंदा पुजारा-विहारीवर लागणार बोली.


आय.पी.एल. (I.P.L.) लिलावात यंदा पुजारा-विहारीवर लागणार बोली, 
जाणून घ्या काय असेल बेस प्राइज.....
 
इंडियन प्रीमियर लीग (आय.पी.एल.) क्रिकेटच्या १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांच्यासह १०९७ क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. 
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे. 
आय.पी.एल. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात ८१४ भारतीय आणि २८३ परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. 
यात वेस्ट इंडिजच्या सर्वाधिक ५६ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. 
याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि दक्षिण आफ्रिकेचे ३८ खेळाडू उपलब्ध आहेत.
 संलग्न राष्ट्रांच्याही २७ खेळाडूंची यात नोंद आहे. 
अनुभवी चेतेश्वर पुजाराची मूळ किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. 
तर हनुमा विहारीची मूळ किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. 
हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारासाठी कोणते संघ इच्छुक आहेत हे १८ फेब्रुवारी रोजी समजेल. 
सोशल मीडियावर पुजाराला चेन्नई संघ घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. 
१८ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रियेला दुपारी ३ वाजता प्रारंभ होईल. 
प्रत्येक संघात कमाल २५ खेळाडूंना स्थान देता येते. 
इंग्लंडचा तुफानी सलामी फलंदाज डेविड मलान यानेही आपली नोंदणी केली आहे. 
त्याची मूळ किंमत एक कोटी ५० लाख इतकी आहे.
 मलानसाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. 
मलानसाठी चेन्नई आणि आर.सी.बी. संघ इच्छुक असल्याचं बोललं जातं आहे.
  १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीसंथ यांच्यासह १०९७ क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे. 
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांनी लिलावातून माघार घेतली आहे.

No comments:

Post a Comment