Breaking

Saturday, 20 February 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- काल दिवसभरात 527 कोरोनाबाधित वाढले, चौघांचा मृत्यू.


दिवसभरात ५२७ कोरोनाबाधित वाढले,
चौघांचा मृत्यू.........
 
पुणे शहरात दिवसभरात ५२७ कोरोनाबाधित वाढले असुन, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख ९६ हजार ९१६ झाली आहे. 
 ४ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू झालेल आहे. 
दरम्यान  २८० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 तर  १ लाख ८९ हजार ७०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढला आहे. 
शहरात  दिवसभरात २८१ तर ग्रामीणभागातून शहरात उपचारासाठी आलेले २ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. 
तर, ३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 
दिलासादायक बाब म्हणजे  एकाही मृत्यूची नोंद नाही. 
पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २ हजार ६९८ वर पोहचली आहे. 
यापैकी, ९८ हजार १६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. 
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८७९ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment