अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता सादर करणार अर्थसंकल्प...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार असून करोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
करोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.
आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
आर्थिक दृढीकरण आणि १५ व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल.


No comments:
Post a Comment