माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-
*महापरिनिर्वाण दिनी टेंभुर्णीमध्ये वंचितचे भव्य रक्तदान शिबीर* -
*महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्रकुमार केंद्रे साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. संजय कोकाटे नेते, मा. प्रमोद कुटे, सरपंच, आयु. सूर्यकांत नाना खरात व इतर मान्यवर उपस्थित होते.*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्ठ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी तसेच मेडिकोअर ब्लड बँक, यांचे वतीने टेंभुर्णी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे कोर्ट रोगाचे सावट व त्यातून रुग्णांसाठी आवश्यक रक्तपुरवठा व सामाजिक बांधिलकी या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. सुरक्षित अंतर मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करून रक्तदात्यांसाठीअल्पोपाहाराचेही नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. यावेळी १०४ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित उपक्रमात सहभाग नोंदवला.*
*सदर रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी विशाल नवगिरे (जिल्हा महासचिव वंचित), मार्गदर्शक राहुल चव्हाण सर, प्रा. युवराज वजाळे सर, प्रविण आण्णा वाघमारे ता.अध्यक्ष, विशाल दादा मिसाळ शहराध्यक्ष टेंभुर्णी, मोडनिंब शहराध्यक्ष गौतम ओहोळ, सिद्धार्थ शेंडगे एड. जुगल खरात, तुषार खरात, राजू वाघमारे, विक्रम खरात, किरण कांबळे, अविनाश लोंढे, रामभाऊ नवगिरे, रणजित गायकवाड, गणेश खरात, तात्या सरवदे, सागर सरोदे भिमानगर, प्रविण बनसोडे शिराळ अद्यक्ष, सुमित खरात, सागर खरात, दादा खरात, व इतर अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..*


No comments:
Post a Comment