Breaking

Tuesday, 1 December 2020

संपादकीय/ विठ्ठल निवृत्ती माळी यांचा देहदानाचा निर्णय मात्र कोरोना महामारीमुळे ते शक्य झाले नाही.


संपादकीय/ आज दि.1/12/2020 रोजी पहाटे 4 वाजता आपल्या मोडनिंब गावातील सोमनाथ विठ्ठल माळी यांचा फोन आला माझ्या वडिलांचे निधन झाले आहे तरी त्यांनी देहदान केले होते तरी विजय परबत आपण हनुमंत कुंभार गुरुजी यांना फोन करून ही बातमी लगेच द्यावी व माझ्या वडिलांचे निधन झाले आहे असे सांगावे तसेच त्यांनी कुंभार गुरुजींच्या सांगण्यावरून देशहितासाठी देहदान केले होते आपला देह मेडिकल स्टाफसाठी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर लोकांसाठी उपयोगी ठरावा म्हणून माझ्या वडिलांनी देहदान केले होते तरी आपण लगेच याबाबत कुंभार गुरुजींना माहिती द्यावी मी म्हणालो हो ठीक आहे मामा मी लगेचच कुंभार गुरुजींना फोन करतो व या संदर्भात माहिती देतो ते काय म्हणतील ते लगेचच आपल्याला फोन करून सांगतो मीही तसेच केले मी लगेचच हनुमंत कुंभार गुरुजी यांना फोन केला व यासंदर्भात माहिती दिली की गुरुजी मला सोमनाथ विठ्ठल माळी यांचा फोन आला होता व त्यांच्या वडिलांचे विठ्ठल निवृत्ती माळी यांचे निधन झाले आहे तरी त्यांनी देहदान केले होते म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या मुलाने मला आपल्याला फोन करायला सांगितला आहे गुरुजी म्हणाले त्यांच्याजवळ एक कार्ड आहे त्या कार्ड वरती सोलापूर कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल मधील डॉक्टर अंजली गोसावी यांचा नंबर आहे त्या नंबर वरती त्यांना फोन करायला सांगा असे कुंभार गुरुजी यांनी सांगितले गुरुजी असेही म्हणाले मृत्यू झाल्यापासून तीन तासाच्या आत बॉडी नेली जाते तीन तास होऊन गेले तर ते नेत नाहीत मी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ माळी यांना फोन केला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व काही सांगितले त्यांनी लगेचच सोमनाथ माळी यांनी लगेचच सोलापूर कुंभारी हॉस्पिटल येथील डॉक्टर अंजली गोसावी यांना फोन केला व माझ्या वडिलांचे निधन झाले आहे असे सांगितले तसेच त्यांनी देहदान केले होते ही कल्पना त्यांनी डॉक्टरांना दिली परंतु डॉक्टरांनी सांगितले की सध्या कोरोना महामारी मुळे आम्ही कोणताही देहदान केलेला देह घेत नाही सध्या तरी ते बंद आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यावर लगेच सोमनाथ माळी यांनी मला फोन केला व हकीकत मला सांगितली लगेचच मी कुंभार गुरुजी यांना फोन केला व घडलेली सर्व हकीकत सांगितली कुंभार गुरुजी म्हणाले सोमनाथ माळी यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले परंतु डॉक्टरांचे तसे म्हणणे असल्यामुळे पुढचा निर्णय त्यांच्या घरच्यांना घेऊ द्या मी लगेचच सोमनाथ माळी यांना फोन करून यासंदर्भात बोललो परंतु या सर्व प्रसंगावरून मला एक जाणवले की माळी कुटुंबीयांची समाजासाठी असलेली तळमळ व देशा वरती असलेले प्रेम तसेच आपल्या वडिलांनी देहदान केले आहे म्हणून वडिलांचा शब्द खरा करण्यासाठी त्यांच्या मुलाने केलेली धडपड ही मला यातून दिसून आली व हनुमंत कुंभार गुरुजी यांनी पहाटे-पहाटे माझा फोन उचलणे व मला त्याबाबत योग्य मार्गदर्शन करणे व सल्ला देणे असे मला या घटनेतून दिसून आले मी सकाळी कुंभार गुरुजी यांना भेटलो व देहदान बाबत सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली गुरुजींनी असे सांगितले की आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून आपण व आमच्या टीमने 48-50 जणांचे देहदान केले आहे व त्यातून जे नवीन डॉक्टर होण्यासाठी  ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस साठी त्या देहाचा उपयोग होतो मी हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झालो मला पुढे काही बोलावे तेच कळेना परंतु आज यातून मला एकच दिसून आले की माळी कुटुंबीयांची समाजासाठी असलेली धडपड व आपल्या वडिलांचा शब्द खरा करण्यासाठी त्यांच्या मुलाचा मला आलेला फोन व कुंभार गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून उभा केलेले समाजकार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे निश्चितच अशा गोष्टींची इतिहासात नोंदच करावी लागेल..........संपादक 
                    विजयकुमार परबत (पत्रकार)
                        *VBP NEWS*

No comments:

Post a Comment