मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश- याबाबत सविस्तर वृत्त असे की बर्याच दिवसांपासून सोशल मिडीया वरती अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या बातम्या येत होत्या.
पण प्रत्यक्षात अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सौ.रश्मीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरीताई पेडणेकर उपस्थित होत्या. पुढे पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर म्हणाल्या की मी जन्माने हिंदू, माझा धर्महि हिंदू, आज एका हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश केल्याचा आनंद वाटला असे त्यांनी बोलताना सांगितले आहे.


No comments:
Post a Comment