मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- महाराष्ट्र सरकारच्या वतीने रणजितसिंह डिसले गुरूजी यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मराठमोळे शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळवला; ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे, याचा दाखला या पुरस्काराच्या रुपानं मिळाला आहे. तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. डिसले सरांनी तयार केलेले क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुलं वापरत असून जगभरातील, देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल, यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या ज्ञानाचा वापर करावा असे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब बोलताना म्हणाले.
Tuesday, 8 December 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- महाराष्ट्र सरकारच्या वतीने रणजितसिंह डिसले गुरूजी यांचा सत्कार.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- महाराष्ट्र सरकारच्या वतीने रणजितसिंह डिसले गुरूजी यांचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment