Breaking

Sunday, 6 December 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वान दिन विशेष...


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा (6 डिसेंबर) ६४वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र येत असतात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झालं होतं. तेव्हापासूनच हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन'  म्हणून पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर बॊध्द आनुयायी येत असतात 
दलित समाजाला तसंच अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच बाबासाहेबांनी न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला. जातीय भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध ते नुसते लढलेच नाहीत तर दलित समाजातील प्रत्येकाला त्यांनी मानाने जगण्याची शिकवण दिली. लाखो शोषित-पीडितांची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतीदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.
आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.

निधनापूर्वी आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतातपण दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात पण ह्यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरूनच दर्शन घ्यावे,  महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाइन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधेचे नियोजन राज्य सरकार आणि महापालिका करीत असून त्यामुळे जनतेने घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे 
,   ६ डिसेंबर १९५६ ची पाहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी, या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला, वाऱ्यासारखी  बातमी साऱ्या देशभर पसरली, दिनांचा वाली आता राहिला नाही, त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही, जी सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अश्या स्थितीतही लोक मुंबईला येत होते, प्रत्तेक जण रडत होता, कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते, अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता, चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबांचा देह ठेवला गेला, बाबांच्या चितेतील एक एक ठिणगीही जणू प्रत्येकाला संदेश देत होती, की "बाळांनो रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र आणू नका,शिका, संघटित व्हा, अन संघर्ष करा". 
प्रज्ञेच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून विनम्र अभिवादन...!

No comments:

Post a Comment