मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वाशीम तालुक्यातील अनसिंग शहरातील युवकांचा मनसेत प्रवेश-
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब मा. अभिजित पानसे साहेब, राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, मा. आनंद एबडवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात्वाखाली वाशीम तालुक्यातील अनसिंग शहरातील कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.यावेळी प्रमुख उपस्थिती विध्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, तालुका अध्यक्ष मोहन कोल्हे, शहर संघटक वाशीम गजानन धोंगडे, अमोल मुळे मनसे सैनिक अमोल मापारी, निखिल बुरकुले, मयूर दाभाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नवगणकर, गणेश राऊत, व मित्र परिवार यांनी केले यावेळी शहरातील विविध वॉर्डातील युवकांनी प्रवेश केला, शहरात सहा शाखा उघडण्यात येणार आहेत आभार प्रदर्शन यश चव्हाण यांनी केले.


No comments:
Post a Comment