सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- वर्गमित्राच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांना वर्गमित्रांचा मदतीचा हात -
कोपर्डे हवेली यशवंत नगर ता.कराड येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील दहावीच्या सन 2000 मधील बॅचमधील विद्यार्थ्यांना आपला वर्गमित्र अमित महादेव चव्हाण निधन पावल्याचे समजताच त्यांच्या कुटूंबियांना आधार देत 3 लाख 55 हजार रूपये जमा करून मुलांच्या पुढील शिक्षणासाठी अमित यांची पत्नी दिपाली चव्हाण यांच्या नावे विमा पॉलीसी काढण्यात आली.
अमित चव्हाण हे नाशिक येथे जकात नाक्यावर काम करत असतानाच कोरोनाने त्यांचा बळी घेतला या घटनेने त्यांचे कुटुंब दुःखात असताना सन 2000 च्या बॅचने त्यांना मदतीचा हात देऊन त्यांच्या कुटूंबियांना आधार दिला.
हा उपक्रम राबविण्यासाठी अजय पाटील ,अमोल पाटोळे ,शंभूराज जाधव , अमोल चव्हाण , संभाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment