पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- इथेनाॅल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना मदत करा...नितिनजी गडकरी - या बाबत सविस्तर वृत्त असे की राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला दिशा देणारे साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणीत आहेत, इथेनाॅल प्रकल्पांना कर्ज देण्यास बॅंकाही तयार नाहीत, त्यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाने आता थेट कारखान्यांशीच करार करून आसवानी प्रकल्प तारण घेत आणी इथेनाॅल खरेदी करण्याचा तोडगा मी सुचवला आहे अशी माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांनी दिली आहे.
एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन करताना नितिनजी गडकरी बोलत होते. यावेळी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, लेखिका वीणा गवाणकर, प्राज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रमोद चौधरी, डाॅ.रविंद्र उटगीकर, राजहंस प्रकाशनचे डाॅ. सदानंद बोरसे उपस्थित होते.
शेतकरी आता गहू,तांदूळ,मका, भाजीपाला अशी पिके घेत कधीही समृद्ध होणार नाही शेतकरी कर्जात जन्म घेतो कर्जात जगतो आणि कर्जा तच मरतो त्यामुळे आता शेतकऱ्यांना इथेनॉल व बायोसीएनजीचे उत्पादक व्हावे लागेल, तोच त्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे जैवइंधन निर्मिती वाढल्यास इंधन आयात कमी होईल व रोजगार मिळेल ग्रामीण भागाचाही विकास होईल असा आशावाद नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केला.
देशाला भरपूर इथेनॉल हवे आहे मात्र एनपीएत गेलेल्या साखर कारखान्यांना नवे इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळत नाही शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करताच एफआरपी द्यावी लागते त्यामुळे हाती पैसा नाही त्यामुळेच आता कारखान्यांशी थेट पेट्रोलियम मंत्रालयाने त्रिपक्षीय करार करावा असा तोडगा मी सुचवला आहे तेल कंपन्या कारखाने यांच्यात करार झाल्यास ही समस्या सुटेल असे ते म्हणाले.


No comments:
Post a Comment