पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- पंढरपूरात संचारबंदी परंतु ती वाटत नव्हती- याबाबत सविस्तर वृत्त असे की कार्तिकी एकादशी निमित्त प्रशासनाने पंढरपूर मध्ये संचारबंदी लागू केली आहे व सर्व वाहनांना पंढरपूर मध्ये येण्यास मनाई आहे, परंतु पंढरपूर मध्ये काल सायंकाळी पाच ते सहा या काळात परिस्थिती फारशी संचारबंदी असल्यासारखी वाटत नव्हती, कारण अनेक लोक कामानिमित्त ये जा करत होते, मोटारसायकली रस्त्यावर फिरत होत्या, व आधीच केलेल्या गवगव्या मुळे सामान्य नागरिक मात्र रस्त्यावर दिसत नव्हते, गल्लो गल्ली गर्दी कमी असल्याने लहान मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत होती, वारकरी संप्रदायाचे मंडळी पंढरपूरच्या दिशेने येत होते परंतु पोलिस त्यांना तीन रस्त्यावर अडवून परत पाठवित होते, वाळवंटात मात्र शुकशुकाट होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment