Breaking

Saturday, 28 November 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा विजय पक्का... युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-
*भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम भाऊ देशमुख यांचा विजय पक्का - प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील*
शुक्रवारी माढा तालुक्यातील विविध ठिकाणी  भाजपा आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्त्यांची विशेष बैठक व मतदारांच्या गाठीभेटी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. विक्रांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की  पुणे पदवीधर मतदारसंघाचे  अधिकृत उमेदवार संग्राम भाऊ देशमुख  यांचा विजय  निश्चित आहे  पुणे पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा  बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री  प्रकाश जावडेकर तसेच माजी महसूल मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत दादा पाटील  या मतदारसंघातून  अनेक वेळा विजयी झाले आहेत एखादा अपवाद वगळता या मतदारसंघातील मतदारांनी  भारतीय जनता पार्टीला प्रथम पसंती  प्रत्येक वेळेस दिली आहे, व या ही वेळी पुणे पदवीधर मतदारसंघातील सुशिक्षित मतदार संग्राम भाऊ देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असे मत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले, पुढे बोलताना ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच माजी






 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली भारतीय जनता पार्टी मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत पोचली आहे.  तसेच पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संग्राम भाऊ देशमुख अधिकाधिक प्रयत्न करतील, वर्षातून किमान दो
न वेळा  पदवीधरांचा  मेळावा घेण्याचा मानस स्वतः उमेदवार संग्राम भाऊ देशमुख यांनी घेतला आहे. या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. राहुलजी महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष श्री अनुपजी मोरे , प्रदेश सचिव श्री. जगन्नाथ बाबा पाटील, प्रदेश सचिव अविनाश राऊत, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री शरद उकवले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी जिल्हा सरचिटणीस अजय जाधव, जिल्हा सरचिटणीस दिपक चव्हाण, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, मदन मुंगळे, रासप तालुकाध्यक्ष गोरख वाकडे, विजय महासागर,नागन्नाथ कदम, सुनील वाळके सर, विवेक कुंभेजकर, विनोद गोटे,सुधीर कुलकर्णी, बंटी शेटे, लखन पवार यांच्यासह पदवीधर मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment