माढा तालुका प्रतिनिधी/मदन मुंगळे-वरवडे टोलनाक्याजवळ पोलिसांनी पकडला 214 किलो गांजा, कारसह 36.41 लाखांचा मुद्देमाल जप्त- याबाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोलनाक्याजवळ टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे व त्यांचे सहकारी तसेच मोडनिंब येथील महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई करून अवैधरित्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणारी कार पकडली.या कार मधून सुमारे 21 लाख 41 हजार 220 रूपये किंमतीचा 214 किलो 122 ग्रॅम गांजा व अंदाजे 15 लाख रूपये किंमतीची कार असा एकूण 36 लाख 41 हजार 220 रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शुक्रवारी ( ता.27 ) सायंकाळी सहाच्या सुमारास केली असून टेंभूर्णी पोलिस ठाण्यात कार चालकाविरूद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे .


No comments:
Post a Comment