सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर -सोलापूर जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ श्रीमंत कोकाटे सर यांना जाहीर पाठींबा-
*महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या घटनेला अनुसरून जो उमेदवार जुनी पेंशन हा आपल्या जाहिरनाम्यात घेईल त्यांना समर्थन या नियमानुसार आदरणीय कोकाटे सर यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रथम क्रमांकावर 2005 नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेंशन लागु करावी हा विषय घेतला आहे*
*संघटनेच्या घटनेशी बांधील राहत तसेच राज्यअध्यक्ष सन्मानीय वितेश खांडेकर सर यांच्याशी विचार विनिमय करून आज सोलापूर येथील पदवीधर मेळावा प्रसंगी जुनी पेंशन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस रामराव शिंदे यांनी पत्राद्वारे पाठींबा जाहीर केला*.


No comments:
Post a Comment