Breaking

Thursday, 5 November 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिस न्यायालयात.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे-पुणे- सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिस न्यायालयात- याबाबत सविस्तर वृत्त असे की सख्या मेहुण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिस कोर्टात पोहोचले आहेत. 






पण चार्जशीट दाखल करताना ज्यांच्या वरती आरोप आहेत ते हजर असणे गरजेचे आहे पण सध्या तसे झाले नाही. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात माजी खासदार संजय काकडे त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 






याबाबत उषा काकडे यांचे सख्खे बंधू युवराज ढमाले ( वय 40, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. युवराज ढमाले हे अनेक वर्षापासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागिदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी आॅगस्ट 2018 मध्ये घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हंटले आहे. 






या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान चतुःश्रुंगी पोलिस चार्जशीट दाखल करण्यासाठी शिवाजीनगर न्यायालयात पोहचले आहेत.अध्याप न्यायालयात या गुन्ह्यांची सुनावणी झालेली नाही. दरम्यान गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर चार्जशीट तयार करण्यात आले आहे. न्यायालयात नेमके काय होणार याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

No comments:

Post a Comment