Breaking

Wednesday, 4 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती येथील आठवडा बाजाराला दिला ग्राहक व व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-हुलजंती येथील आठवडा बाजाराला ग्राहक व व्यापाऱ्यांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद- कोरोनाच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले आठवडे बाजार गेल्या पंधरा दिवसांपासून चालू झाले होते तरीही हुलजंती येथील व्यापाऱ्यांनी दोन आठवडे बाजार बंद ठेवले होते.






शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुते ( वडीयार ) ग्रामपंचायत हुलजंती  तसेच व्यापाऱ्यांना आठवड्याचा बाजार चालू करण्याची विनंती केली होती  
व्यापाऱ्यांनीही त्यांच्या  मागणीला मान देऊन 3 नोव्हेंबर २०२० मंगळवारपासून बाजारात स्टॉल लावण्यास सुरुवात केली. 
सकाळी 11 वाजता  व्यापारी व ग्राहक बाजारात आगमन होऊ लागले  
गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली आठवडी बाजार चालू झाल्याने खाऊ इतर गोष्टी घेण्यासाठी लहान बालके ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती सर्व व्यापार यांचे स्वागत होटेल गुरुकृपा चे मालक जकराया शेजाळ यांनी केले  बाजारामध्ये सोशल डिस्टंसिंग मास्क कंपल्सरी असल्यामुळे सर्वांनी याची काळजी घेऊन बाजारात दाखल झाले होते 
बाजार भरण्यास विशेष प्रयत्न ग्रामपंचायत हुलजंती वआमिर आतार (पत्रकार ) , व्यापारी संघटनेचे रायप्पा परीट, रसूल भाई आतार ,इराया स्वामी , राजशेखर कनशेट्टी , गणू खांडेकर , व इतर व्यापाऱ्यांनी सहकार्य केले,
सर्व व्यापाऱ्यांचे संतोष जामदार यांनी ग्रामपंचायत कर्मचारीच्या वतीने आभार मानले.

1 comment: