सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- माळशिरस तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना जाहीर..तहसीलदार निंबाळकर- याबाबत सविस्तर वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील 16 नोव्हेंबर पर्यंत 46 व 15 डिसेंबर 2020 रोजी 3 ग्रामपंचायतीच्या मुदती संपणार आहेत,
यासाठी नोव्हेंबर 2019 व डिसेंबर 2019 पासून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेला सुरूवात झाली होती, मात्र कोरोना महामारीमुळे ही प्रक्रिया थांबली होती, यानंतर नुकतेच 2 नोव्हेंबर 2020 रोजी ही प्रक्रिया पूर्णत्वास आली.
त्यामुळे माळशिरस तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण अंतीम नमुना अ प्रसिद्ध करण्यात आले यात 18 ग्रामपंचायती मधून 43 हरकती दाखल करण्यात आल्या होत्या, यावर उपविभागीय अधिकार्यांनी हरकतींचा विचार करून कायदेशीर बाबी तपासून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार अंतीम प्रभाग रचना नमुना " अ " प्रमाणे निश्चित करून सदर माहिती तलाठी, मंडल अधिकारी व तहसील कार्यालयात 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment