Breaking

Monday, 16 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- संभाजी ब्रिगेड चे उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठींबा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर -

*संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार इंजि.मनोजकुमार गायकवाड यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा.*-

*संभाजी ब्रिगेड'चे अधिकृत उमेदवार इंजि.मनोजकुमार गायकवाड यांना संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या उपस्थितीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.* तसेच इंजि.मनोजकुमार गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी  *पीपल्स रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीने  पदवीधर मतदारांपर्यंत जाऊन प्रचार करणार आहे, तसेच संभाजी ब्रिगेड व इंजि .मनोजकुमार गायकवाड यांनी केलेल्या  चांगल्या कामा बद्दल प्रभावीत होऊन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देत आहे असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.*






*संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद,व सोमेश्वर नगर परिसरात बैठक घेण्यात आली,* बैठकी मध्ये  पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सज्ज राहण्याच्या व जास्तीत जास्त *पदवीधर मतदारां पर्यंत पोहोचण्याच्या सुचना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिल्या.* तसेच प्रचाराची पुढील दिशा ठरवण्यात आली. यावेळी  पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव निलेश ढगे, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमित लोंढे,संभाजी ब्रिगेड व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक कावरे, संभाजी ब्रिगेड' चे शाखाध्यक्ष दीपक कराड,शाखा कार्याध्यक्ष बाळू आखाडे, सचिन खेडकर,भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष शरद गायकवाड व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment