पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावनिहाय प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या असून ग्रामपंचायतीच्या निवडणूका होईपर्यंत गावचा संपूर्ण कारभार हे प्रशासक करणार आहेत.
माढा तालुक्यातील नोव्हेंबर 2020 अखेर 82 ग्रामपंचायतींची मुदत संपत आली आहे व त्यामुळे पुढील निवडणुका होईपर्यंत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालू ठेवण्यासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी तालुक्याच्या 82 ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्ताराधिकारी, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अभियंते यासारख्या अधिकार्यांची नेमणूक केली आहे. त्याबाबतचे आदेश गटविकास अधिकार्यांना दिले आहेत.


No comments:
Post a Comment