पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- धाराशिव कारखाना शेतकर्यांना 200 रूपयांचा हप्ता देऊन यंदाची दिवाळी गोड करणार- याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूरातील डिव्हिपी उद्योग समूहाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने शेतकर्यांची यंदाची दिवाळी गोड व्हावी म्हणून 200 रूपयांचा तिसरा हप्ता व साखर वाटप करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला होता,त्यामुळे शेतकर्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत होती, परंतु या कारखान्याने अन्य कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकर्यांना पोळा व दिवाळी हे महत्वाचे सण असतात, कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या काळात या सणांची शेतकर्यांना ओढ लागलेली असायची.कारण या दोन्ही सणाच्या वेळी साखर कारखान्याकडून ऊस बिलाचे हप्ते शेतकर्यांना मिळत असायचे, त्यामुळे सध्यस्थितित अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांची स्थिती लक्षात घेता धाराशिव साखर कारखान्याने जुन्या परंपरेला उजाळा देत शेतकर्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 200 रूपयांचे बील देण्यात येत आहे.
गेल्या वर्षी ऊसाचे प्रमाण कमी असूनही कारखाना सुरू केला, कामगारांना आणी कारखाना भागातील शेतकर्यांना न्याय देऊन कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी 2500 रूपये दर जाहीर केला होता, त्याप्रमाणे 2100 रूपयांचा पहिला हप्ता म्हणून वाटप केले तर पोळा सणासाठी 200 रूपये शेतकर्यांना देण्यात आले होते, उर्वरित 200 रूपये दिवाळी सणासाठी देण्यास सुरुवात केली आहे, दिवाळी सणासाठी प्रत्येक ऊस पुरवठादार शेतकर्यांना आणी सभासदाला प्रत्येकी 25 किलो साखर वाटप करण्यात येत आहे, अशी माहीती डिव्हिपी उद्योग समूहाचे अध्यक्ष पाटील यांनी VBP न्यूज सोबत बोलताना दिली आहे.


No comments:
Post a Comment