पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- ईडी आणी अर्थमंत्रालयाकडे सोपवणार 120 सत्ताधारी पक्षातील नेत्यांची यादी...संजय राऊत- याबाबत सविस्तर वृत्त असे की 📣 *ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी:संजय राऊत*
🔰 ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे आपण १२० नेत्यांची यादी सोपवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यांनी शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना जे मुख्य लोक महाराष्ट्रात आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान अद्याप ईडीची कोणती नोटीस आपल्याला आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.या सगळ्या चौकशा पूर्ण झाल्यानंतर मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे १२० नेत्यांची यादी पाठवतो. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावे या यादीत आहेत. मग कोणाला ईडी नोटीस पाठवते हे पाहू, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. अनेकांनी नोटीस आली का असे मला विचारले.
मी वाट पाहत असून नोटीस आली तरी आश्चर्य वाटणार नाही. माझ्यासोबतच अजित पवार किंवा अन्य कोणत्याही नेत्याला नोटीस आली तर धक्का बसणार नाही. कारण सध्या २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचे काम सुरु असल्याचे मला कळले आहे. त्यासाठी आम्हीदेखील तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment