मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- सोलापूर येथील बोरामणी विमानतळाच्या भुसंपादनासाठी मिळाली सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता
माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.
सोलापूर : आज दि. 29 ऑक्टोंबर 2020 रोजीच्या बैठकीनुसार सोलापूर येथील बोरामणी विमानतळासाठी अतिरिक्त 29.94 हे.आर. खाजगी जमिन संपादनासह एकूण सुमारे 580 हे. जमिन संपादनास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त 29.94 हे.आर. खाजगी जमिन संपादनापोटी होणारया रु. 46.29 कोटी अतिरिक्त खर्चासह एकूण रु. 122.79 कोटी खर्चास सुधारित वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त भुसंपादनासाठी आवश्यक रकमेपैकी रु. 40.00 कोटी निधी सन 2020-21 या आर्थिक वर्षात तरतुदीत वितरीत करण्यास मान्यता देण्यात
आली आहे. याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत बैठक आयोजित केली होती. यानुसार शासन निर्णय क्र. मविवि-1619/प्र.क्र.55/28-अ, दि. 29 ऑक्टोंबर 2020 रोजी विमानतळाच्या भुसंपादनासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता व वित्तीय मान्यता मिळाली आहे.


No comments:
Post a Comment