मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- पंचतारांकित हॉटेल वर अभिमानाने फडकवला मनसेचा भगवा झेंडा! मनसे चा बुलंद आवाज श्री. गजानन राणे साहेब ह्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले.
#सहार : 'अॅम्बेसिडर फ्लाइट किचन' कंपनीच्या प्रशासनाने मनसेचा भगवा झेंडा हॉटेलच्या गेटवरून हटविला होता, यासंदर्भात काल मनसे कामगार सेना सरचिटणीस कामगार नेते श्री. गजानन राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचं शिष्टमंडळ व्यवस्थापने सोबत 'अॅम्बेसिडर फ्लाईट किचन' मध्ये गेले असता तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व व्यवस्थापन जाणूनबुजून चर्चेसाठी उपस्थित नव्हते, यावेळी पोलीस प्रशासनाच्या समोर मनकासेच्या पदाधिकार्यांनी हॉटेलच्या गेटवर मनसे चा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने लावला.
"जर ह्यानंतर देखील व्यवस्थापनाने असाच आडमुठेपणा केला आणि कामगारांना पुन्हा कामावर घेतले नाही तर, आम्ही 'Ambassador Flight Kitchen' हॉटेलला मनसे #दणका दिल्या शिवाय राहणार नाहीत!" असं गजानन राणेसाहेब ह्यांनी कंपनी व्यवस्थापनाला ठणकावून सांगितले.


No comments:
Post a Comment